नवी दिल्ली : सर्वांना माहित आहे, की तुम्हाला गाडी कशी चालवायची हे माहित असलं तरी चालविण्यासाठीचं अधिकृत लायसन्स वयाच्या 18 व्या वर्षीच मिळतं. खरंतर या निश्चित वयाच्या आधी अप्रतिम ड्रायव्हिंग करू शकणारे लोक खूप कमी असतील.
मात्र आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात १८ वय सोडाच, तर ज्या वयात मुलांना व्यवस्थित बोलताही येत नाही, त्या वयात एका चिमुकल्यानं गाडी चालवल्याचं पाहायला मिळालं.. 3 वर्षांच्या मुलाला Ferrari चालवताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. @OnlyBangersEth या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 3 वर्षांच्या मुलाला फेरारी चालवताना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाहन चालवताना मूल सर्व सुरक्षा उपकरणे परिधान करून स्टीयरिंग हाताळताना दिसलं.
पुढच्याच क्षणी त्याने वेगात गाडी पळवली. हा व्हि़डिओ पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा Ferrari चालवताना दिसत आहे.
सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या मुलामध्ये अतिशय कॉन्फि़न्सही दिसतो. त्याच्याकडे बघून त्याने Ferrari सारख्या गाडीचं स्टेअरिंग पकडलं आहे, असं अजिबातच वाटत नाही. पहिल्यांदा पाहताना एखाद्याला असं वाटेल की कदाचित हा मुलगा त्याच्या पालकांच्या गाडीमध्ये बसून फक्त फोटोसेशन करत आहे. पण पुढच्याच क्षणी जेव्हा त्याने गाडी रस्त्यावर पळवली तेव्हा बघणारे आश्चर्यचकित झाले.
विशेष म्हणजे त्याच्यासोबत या गाडीमध्ये इतर कोणीही बसलेलं दिसलं नाही.
व्हिडिओवर विश्वास ठेवणं कुणालाही अवघड जाईल. ज्यामध्ये 3 वर्षाच्या मुलाला फेरारी चालवताना दाखवण्यात आलं आहे. अनेक युजर्सना ही गोष्ट पचनी पडली नाही, त्यामुळे या लहान मुलावरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
अनेकांनी सांगितलं, की कमी वयात गाडी चालवण्याने त्यांना फटकारलं गेलं होतं. अनेक वापरकर्त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. पण या मुलाचा तर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. एका वापरकर्त्याने असंही म्हटलं आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी फेरारी प्रत्यक्षात कोणीतरी चालवत आहे. तर एवढ्या लहान वयात मुलाच्या हातात एवढं मोठं वाहन देणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. या व्हिडिओला 95000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
0 Comments