याबाबत ची अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की “कर्माटेक २के२३” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेंटेशन, ब्लाईंड सी, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्सिबीशन, मोडेल मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, सर्किट सुडोकू, अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी वीस हजार रुपायंहून अधिक ची बक्षिसे दिली जाणार आहेत.
या सर्व स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर होतील. तसेच सदरच्या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून अभियांत्रिकीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस पी पाटील व “कर्माटेक 2के23” चे संयोजक प्रा. अनिल बाबर यांनी केले. विद्यार्थ्यानी “कर्माटेक 2के23” मध्ये सहभाग नोंविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ९४२३५८६७५५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.
0 Comments