Pandharpurlive : मुरेना शूटआऊटने(MorenaShootout) सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाला आहे.
मुरेना येथे लाठ्या-काठ्यांवरून सुरू झालेले भांडण गोळ्या झाडण्यापर्यंत गेले.
मुरेना : मुरेना शूटआऊटने (Morena Shootout) सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाला आहे. मुरेना येथे लाठ्या-काठ्यांवरून सुरू झालेले भांडण गोळ्या झाडण्यापर्यंत गेले. यामध्ये दोन्ही बाजूकडून समोरासमोर गोळ्या झाडण्यात आल्या. 10 वर्षातील वैर असताना 9 जणांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला.
लेपा हे गाव मुरेना शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असून, येथे म्हणावा तसा विकास झालेला नाही. तोमर बंधू-भगिनींची अनेक कुटुंबे एकाच गावात राहतात. त्यामध्ये धीर सिंग आणि गजेंद्र सिंग यांची कुटुंबे होती. तरीही या दोन कुटुंबांमध्ये कोणताही व्यवहार नव्हता. मात्र, गावातील जमिनीचा तुकडा या दोन कुटुंबांमध्ये वादाचे कारण ठरला. यात तीन जण जागीच ठार झाले.
वादानंतर गोळीबार
या दोन कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद सुरु होता. सुरुवातीला या दोन्ही कुटुंबामध्ये लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरु होती. मात्र, नंतर दोन्ही कुटुंबाकडून गोळीबार सुरु करण्यात आला. पण जेव्हा गोळीबार थांबला तेव्हा गोळी लागल्याने अनेक जण जखमी झाल्याचे दिसले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. यादरम्यान 4 महिलाही जखमी झाल्या. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिघांचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते.
गावात पोलीस बंदोबस्त
एएसपी रायसिंग नरवारिया यांनी माहिती देताना सांगितले की, या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0 Comments