Pandharpur live : कांकेर नॅशनल हायेववर जगतरा येथे हा भीषण अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाडी धमतरीच्या सोरम गावाहून बुलेरोने मरकाटोला येथील लग्न सोहळ्याला निघाले होते.
मात्र, मध्येच अपघात झाला. या अपघातात एकूण 11 जण दगावले आहेत. त्यात दोन मुलांचा आणि पाच महिलांचा समावेश आहे.
काळरात्र ठरली
बुधावारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात एकूण अकराजण दगावले. हे सर्वजण लग्नासाठी जात होते. बुलेरोने ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी जोरदार होती की गाडीतील दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिल.
मुख्यमंत्र्यांचं ट्विट
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. बालोदच्या पुरुर आणि चारमा दरम्यान बालोदगहनजवळ लग्न सोहळ्यासाठी जात असतानाच बुलेरो आणि ट्रक दरम्यान जोरदार धडक झाली. त्यात 11 वऱ्हाडींचा मृत्यू झाला आहे, असं ट्विट करत बघेल यांनी माहिती दिली. तसेच या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
मृतांची नावे
केशव साहू (34), डोमेश ध्रुव (19), टोमिन साहू (33), संध्या साहू (24), रमा साहू (20), शैलेंद्र साहू (22), लक्ष्मी साहू (45), धरमराज साहू (55), उषा साहू (52), योग्यांश साहू (3), ईशान साहू (दीड वर्ष) आदींचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
0 Comments