Pandharpur live : करमाळा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील आवटी येथील वली चांद पाशा दर्गाहच्या दर्शनासाठी जात असताना पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या ट्रॅव्हलसचा भीषण अपघात (solapur accident to devotees private travels 20 people injured) झाला आहे.
ही ट्रॅव्हल्स बस वीट जवळील पळसओढा भागात पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) 20 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार ते पाच भाविकांना मोठी दुखापत झाली आहे.
जखमी झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे
आम्मार खान (वय 19) अर्शद शेख (वय 30) कुद्दुस भट्टी (वय 18) इम्तियाज भट्टी वय (40) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच नाजमीन शेख (वय 45) सलीमा शेख (वय 70) शबनम भट्टी (वय 23) गफ्फार खान (वय 48) नेहा शेख (वय 29) निलोफर भट्टी ( 35), अफरोज खान (वय 38) अमर शेख (वय 4), इनायत शेख (वय 5), खतिजा शेख (वय 23) ,अमिना शेख (वय 12) परविन शेख (वय 45), शहबाज शेख (वय 32 मिजबा खान (वय 25 ), उमामा खान (वय17) ,फरहान शेख (वय 39) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कसा घडला अपघात?
हि बस पुणे येथुन 23 प्रवाशी भाविकांना घेऊन आवाटी दर्गाह येथे खासगी ट्रॅव्हल निघाली होती. या अपघातात 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दहा पुरुष, आठ महिला आणि पाच लहान मुले यांचा समावेश आहे.
0 Comments