महाराष्ट्र : वाहनचोरांची आंतरराज्य टोळी गजाआड,दहा चारचाकींसह सव्वा कोटींचा मुद्देमाल हस्तगत

 

Pandharpur live: सातारा जिह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने चारचाकी वाहनचोरीच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून चारचाकी वाहनचोरीचे दहा गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तसेच, आणखी एका कारवाईत पोलीस रेकॉर्डवरील त्रिकुटाला पकडून त्यांच्याकडून दुचाकीचोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून 1 कोटी 18 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अजिम सलिम पठाण (वय 38, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) व अजित आण्णाप्पा तिपे (वय 40, रा. कोल्हापूर) अशी चारचाकी वाहनचोरीमधील आरोपींची नावे असून, दोघेही पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिह्यातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली तपास पथक तयार केले आहे. दरम्यान, अजिम सलीम पठाण या पोलीस रेकॉर्डवरील आरोपीने परराज्यातून चोरी झालेली चारचाकी काहने आणून ती सातारा, रायगड तसेच सोलापूर जिह्यात विकल्याची माहिती 30 एप्रिल रोजी अरुण देवकर यांना मिळाली आहे. त्याप्रमाणे त्यांनी या आरोपीला ताब्यात घेऊन तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार अजिम पठाण व कोल्हापूर येथील अजित तिपे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत परराज्यातून चोरीची चारचाकी वाहने आणून ती सातारा व रायगड जिह्यात विकल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींकडून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली वॅगन आर कार तसेच दिल्ली व उत्तर प्रदेशमधून चोरी केलेल्या इनोव्हा क्रिस्टा, मारुती ब्रिझा, होंडा सिटी, मारुती स्किफ्ट, मारुती बलेनो व चार क्रेटा अशा 1 कोटी 15 लाख रुपयांच्या 10 चारचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या.

सराईत दुचाकीचोरांनाही अटक; आठ गुन्हे उघड

दुसऱ्या मोठय़ा कारवाईत दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमास धक्काबुक्की क मारहाण करून त्याची होंडा ऍक्टिक्हा मोपेड क त्याच्या खिशातील रोकड चोरून नेली होती. त्या गुह्याचा तपास करताना दुचाकी वाहनचोरटय़ांची टोळी निष्पन्न झाली. भुईंजच्या गुह्यात चोरीस गेलेली होंडा ऍक्टिक्हा मोपेड तसेच आरोपी महेश रामचंद्र अकघडे क त्याच्या इतर दोन साथीदारांनी सातारा शहर, पाटण, किणी टोलनाका तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. महेश रामचंद्र अकघडे (कय 25, रा. कोडोली, ता. जि. सातारा), संतोष मारुती बाबर (कय 20, रा. बाबाची काडी, ता. कोरेगाक), कैभक प्रमोद बाबर (कय 23, रा. कोंडके, ता. जि. सातारा), कृष्णात रत्नकांत काकडे (कय 26, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा), अमित राजेंद्र बैले (कय 19, रा. उंब्रज, ता. कराड) अशी दुचाकी चोरीमधील आरोपींची नाके आहेत.



Post a Comment

0 Comments