Pandharpur live news : पोलिसांनी मृतदेह खाली सोडवून कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. राहुल यांचे १२ जूनला लग्न होते
भुईंज : केंजळ (ता. वाई) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
लग्नाला अवघे दोन दिवस उरल्याने टोकाचे पाऊल उचलल्याने केंजळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल सुरेश जगताप (वय ३२) याने काल सकाळी केंजळ येथील भट नावाच्या शिवारातील वेताळबा ओढ्यातील वडाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गावातील अनिकेत जगताप यांच्या निदर्शनास आली. त्याने लागलीच कुटुंबीयांना व पोलिस पाटील यांना कळविले.
त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली सोडवून कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. राहुल यांचे १२ जूनला लग्न होते. त्यासाठी त्याने भुईंज पोलिस ठाण्यात बँडचा रीतसर परवाना घेतला होता.
आज अचानक राहुलने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात (Bhuinj Police Station) झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पुष्पलता धायगुडे करीत आहेत.
0 Comments