Pune Crime | सिने कलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

  Pandharpur live news : मराठी चित्रपटात काम करणाऱ्या सिनेकलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, चोरलेले मोबाईल असा ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे : मराठी चित्रपटात काम करणाऱ्या सिनेकलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, चोरलेले मोबाईल असा ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


स्वप्नील दादा कोतवाल (वय २३ वर्षे, रा. शिंदे वरती, हडपसर), महेश बबन गजेसिंह (वय २२, रा. भिमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत वानवडी पोलीस ठाणय्ात एका तरुणाने तक्रार दिली आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक संदिप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अंमलदार अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, संतोष नाईक यांच्यासह पथकाने केली. वानवडी मधील बी.टी. कवडे रस्त्यावर २१ मे रोजी ही घटना घडली.


तक्रारदार चित्रपटात ज्युनिअर कलाकार म्हणून काम करतात. दहा दिवसांपुर्वी तक्रारदार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे मित्र हर्ष नाथे व जिशान पटनी असे सासवड येथे मराठी पिक्चरचे शुटींकरीता निघाले होते. त्यावेळी वानवडी बी.टी. कपडे रोडलगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यास थांबले होते. यादरम्यान तेथे उभा असलेल्या एकाने जाणीवपूर्वक त्यांना धक्का मारून शिवीगाळ केली. धारदार हत्यार त्यांच्या मानेवर ठेवत पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. तसेच, "जान प्यारी है क्या, फोन प्यारा है, जान प्यारी है तो चल जाव' अशी धमकी देत फोन व पैसे काढून घेतले. यावेळी येथे असलेल्या तक्रारदारांचा मित्र हर्ष व जिशान यानांही हाताने मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील १९ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. तपासात सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर लागलीच या दोघांना पकडले. तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

Post a Comment

0 Comments