Pune | चोरट्यांना यमाहा आरएक्स 100 ची क्रेझ, तब्बल 16 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त; तिघांना अटक

  


Pandharpur live news : चोरटय़ांनी देखील यमाहा आरएक्स 100 ची क्रेझ असल्याचे पहायला मिळत असून, दोन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून साडे चार लाखांच्या 16 यमाहा आरएक्स 100 या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पुणे : चोरट्यांमध्ये देखील यमाहा आरएक्स 100 ची क्रेझ असल्याचे पहायला मिळत असून, दोन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून साडे चार लाखांच्या 16 यमाहा आरएक्स 100 या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आदित्य दत्तात्रय मानकर (वय 19) आणि मयूर उर्फ भैय्या पांडुरंग पवार (वय 20, दोघेही रा. उरळी कांचन) यांच्यासह त्यांच्याकडून दुचाकींची खरेदी करणार्‍याला देखील पोलिसांनी पकडले आहे. विश्रामबाग, खडक, लष्कर, फरासखाना आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केले आहेत.


ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दादा गायकवाड, उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, महावीर वालटे, मयुर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात आणि सत्ताप्पा पाटील यांच्या पथकाने केली आहे.


शहरात वाहन चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक चोरटे हे ठरावीक गाड्याच चोरी करून नेत असल्याचेही समोर आले आहे. या चोरट्यांकडून मौजमजा करण्यासाठी अशा ठरावीक गाड्या चोरल्या जातात. दरम्यान, विश्रामबाग पोलीस हे वाहन चोरट्यांची माहिती काढत होते. यादरम्यान, त्यांना परिमंडळ एकमधून यमाहाची आरएक्स 100 दुचाकी चोरी करणारी टोळीच असल्याचे लक्षात आले. ते याच गाड्यांना टार्गेट करून चोरी करत असल्याचे दिसून आले.


अधिक माहिती घेतल्यानंतर आरोपी ऊरूळी कांचन येथील दत्तवाडी भागातून दोघेजन शहरात येऊन चोऱ्या करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल दुंडम यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने व त्यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केला. त्यावेळी त्यांनी विविध भागातून यमाहा दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांनी वेगवेगळ्या भागातून या गाड्या चोरल्या आहेत. त्यांच्याकडून 16 गुन्हे उघडकीस आणत 16 यमाहाच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

यादरम्यान, दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत. चोरटे दिवसभर रेकी करून रात्रीच्या वेळी पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकींची चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. चोरटे केवळ यमाहा आरएक्स 100 या दुचाकीची चोरी करीत होते

Post a Comment

0 Comments