धक्कादायक | राख सावडायला गेले तर सापडली कात्री, नेमकं काय घडला प्रकार? : जाणून घ्या सविस्तर

  


 Pandharpur live news : जयपूरच्या फोर्टिस रुग्णालयावर हृदय शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी कात्री शरिरातच सोडल्याचा आरोप करण्यात आलाा आहे.

कुटुंबीय अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना तिथे कात्री सापडली.


एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फोर्टिस रुग्णालयावर हृदय शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी कात्री शरिरातच सोडल्याचा आरोप करण्यात आलाा आहे. त्यामुळे ऑपरेशननंतर रुग्णाची तब्येत सतत खालावत गेली आणि 12 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला, असा कुटुंबीयांचा दावा आहे.


कुटुंबीय अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना तिथे कात्री सापडली. कुटुंबीयांनी रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत. कुटुंबीय खोटे बोलत असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिप्रा पथ पोलिस ठाण्याच्या मानसरोवर परिसरात राहणारे उपेंद्र शर्मा (74) यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, 12 दिवसांनी 12 जूनच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांचा मुलगा कमलने सांगितले.


त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 29 मे रोजी त्यांचे वडील उपेंद्र शर्मा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जवाहर सर्कल पोलिस स्टेशन परिसरातील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉ.राकेश चित्तोर यांच्याकडून उपचार सुरू करण्यात आले. 30 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या वडिलांना ऑपरेशनसाठी ओटीमध्ये नेण्यात आले.


रात्री दीडच्या सुमारास त्यांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. पण, पहाटे 4 वाजता पुन्हा एक टीम वॉर्डात आली आणि त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. त्यांना पुन्हा का नेले जात आहे हे आम्हाला सांगण्यात आले नाही. नंतर 31 मे रोजी सायंकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ते घरीच होते.


पार्थिवावर अंत्यसंस्कार


12 जून रोजी त्यांची प्रकृती अधिक ढासळू लागली आणि रात्री 8.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी महाराणी फार्म येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


हृदयाजवळ शस्त्रक्रियेची कात्री सापडली


नंतर 15 जून रोजी सकाळी स्मशानभूमीत अस्थी गोळा करण्यासाठी कुटुंबीय स्मशानभूमीत गेले होते. त्याठिकाणी अस्थि आणि राखेवर त्यांनी पाणी टाकले. तेव्हा वडिलांना ज्या ठिकाणी ठेवून अग्लानि दिला होता, त्याठिकाणी हृदयाजवळ शस्त्रक्रियेची कात्री सापडल्याचे मुलाचे म्हणणे आहे.


रुग्णालयाने काय दावा केलाय?


कुटुंबाचा दावा खोटा, निराधार आणि दुर्दैवी आहे. आमच्याकडे शस्त्रक्रियेनंतरचे सर्व अहवाल आणि रुग्णाचे एक्स-रे आहेत. रुग्णाच्या शरीरात शस्त्रक्रियेची कात्री किंवा इतर काहीही नव्हते, हे त्यावरून स्पष्ट होते. अशा चुका होऊ नये म्हणून फोर्टिस कठोर प्रोटोकॉलचे पालन करते, असे फोर्टिस हॉस्पिटल, जयपूरचे झोनल डायरेक्टर नीरव बन्सल म्हणाले.

Post a Comment

0 Comments