Pandharpur Live News: महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष तथा बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी नेते कल्याण दळे यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंढरपूर येथील शहीद मेजर कुणाल गोसावी अंध निवासी शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.
पंढरपूर शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक युवक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा बारा बोलतदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पंढरपूर शहरातील नाभिक संघटना व महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या वतीने एक अनोखा उपक्रम साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Please Subscribe And Press Bell 🔔 Icon Pandharpur Live News YouTube Channel 👇
https://youtube.com/@PandharpurLiveNews
पंढरपूर येथील शहीद कुणाल गोसावी अंध निवासी शाळेमधील मुलांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला व त्या मुलांसोबत मनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.त्या मुलांना पण आपले पालकच आज शाळेत आल्यासारखे वाटले व त्यांनी हे बोलुन ही दाखवले.
त्याप्रसंगी सतीश भाऊ चव्हाण , निलेश शिंदे , सोमनाथ खंडागळे, युवराज हडपद, राकेश देवकर, किरण गाडेकर , स्वरूप चव्हाण हे सगळे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर शहर नाभिक युवक संघटनेचे शहरअध्यक्ष महेश माने यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे शेवटी युवराज हडपद यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments