पंढरपूर, दि.०१ : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे ४० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यावेळी सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री विठ्ठल प्रशाला याचे वतीने श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचा मानपत्र देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करणेत आला.
सदर प्रसंगी प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करुन कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले हाते. त्यामध्ये श्री विठ्ठल सह. साखर कारखाना कार्यस्थळावर पंढरपूर ब्लड बँक व अक्षय ब्लड बैंक सोलापूर शाखा पंढरपूर व श्री विठ्ठल सह. साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन ॲड. दिपक पवार माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व मर्चंट को-ऑप. बँकेचे संचालक श्री अमरजित पाटील व कारखान्याचे सर्व संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आपले सर्वांचे आशिर्वादाने या कारखान्याचा चेअरमन झालेला आहे. माझा वाढदिवस साजरा करताना गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करणेसाठी सत्कारासाठी हारतुरे न आणता शालेय साहित्य घेवून येवून भेटण्यास आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्याकडून १ लाख वह्या जमा झालेल्या आहेत. त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना होईल.
तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रक्तदान शिबीर, सर्वरोग निदान शिबीरे आयोजित करणेत आलेमुळे लोकांना आरोग्याची सेवा उपलब्ध करुन दिली.
उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्त लक्ष देवून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. तरी सर्वांनी येणारा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी सहकार्य करावे. तसेच माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही व या कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देणेसाठी मी कटीबध्द आहे, अशी भावना त्यांनी भावना केली.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्केसर हे संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन मा. श्री अभिजीतआबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की, पुढील वर्षी विद्यमान आमदार म्हणून वाढदिवस साजरा करू.
रक्तदान शिबीरा प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अँड. दिपक पवार हे आपल्या भाषणात म्हणाले की, श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांच्या कार्याचे कौतुक करून संस्थेचा वारसा मोठा आहे, तोच वारसा पुढे चालवून श्री अभिजीत आबा हे या संस्थेचे उत्तम प्रकारे धुरा संभाळत आहेत. मागील सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. श्री विठ्ठल कारखाना हा आपल्या परिवारासाठी आधारवड आहे. त्या करीता येणारा सन २०२३ २४ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणेस सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन करुन श्री अभिजीत आबा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबीरा प्रसंगी मर्चंट को-ऑप. बँकेचे संचालक श्री अमरजित पाटील बोलाना म्हणाले की, श्री अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिला सिझन चांगल्या प्रकारे पार पाडला व कारखाना चालविणेसाठी चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील हे चांगल्या प्रकारे प्रयत्न करीत आहेत, तरी त्यांच्या प्रयत्नांना बळ देवून कारखान्यास भरभराटी येवून गतवैभव प्राप्त करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगुन श्री अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बी. रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी ज्ञानोबा भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासहोब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन बाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, सौ. सविता रणदिवे, श्रीमती कलावती खटके, दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सचिन पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, माजी संचालक ज्ञानेश्वरबापू गायकवाड, संतोष गायकवाड, दिपक सदाबसे तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा अनिता पवार, सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक श्री देशमुख व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments