Pandharpur Live Online: पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दोन्ही नेते एका मंचावर आले होते.
यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी भाषण करण्याआधी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सांगोल्यात एकाच मंचावर आले होते. राष्ट्रवादीचा फुट पडल्यानंतर आणि पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार आणि फडणवीस हे दोन नेते प्रथमच पुन्हा एकत्रित आले होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी शिवसेना-भाजपला आपला पाठींबा देवून सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपाला सातत्याने विरोधच केला होता. यानंतर शरद पवार यांनी भाजप विरोधी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. मात्र आज फडणवीस आणि शरद पवार चर्चा करताना दिसले. यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
0 Comments