भोसरी: नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे गळफास घेत आत्महत्या



 पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी भोसरी  येथे घडली आहे

याप्रकरणी मयत मुलीचे वडील यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी चंद्रभान गौतम (रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वीस वर्षीय मुलगी हिला आरोपीने माहेरून पैसे घेऊन ये यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments