पटवर्धन कुरोली सामाजिक बांधिलकीतून शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप

Pandharpur Live News: पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचकर वस्ती येथे प्रभात दुध डेअरी चेअरमन  अनिल सावंत ग्रामपंचायत सदस्य यांचे कडून विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. 

सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप दरवर्षी त्यांच्याकडून केले जाते. या उपक्रमात खंड न पडता याही वर्षी विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर व  गणेश नाईकनवरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  मारुती कोळसे आदींसह  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याध्यापक धनाजी अभिमान बोबडे सर यांनी केले. तर आभार कैलास सोनवणे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments