आमदार आवताडे यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या वाढीव कर स्थगितीबाबत घेतली आढावा बैठक, स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक झळ पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या आमदार आवताडे यांच्या सुचना

Pandharpur Live News: पंढरपूर नगरपरिषदेने अयोग्य पध्दतीने प्रस्तावित केलेल्या कर वाढीस स्थगिती मिळण्याबाबत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे साहेब यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्यासोबत सदर प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे. तसेच यापूर्वी शहर हद्दीतील मालमत्तेची संख्या २०००० होती. सर्वेक्षणानंतर ती संख्या वाढून २७५०० इतकी झाली आहे.


तसेच नगरपरिषदेकडून शहरातील अनेक मालमत्ता धारकांना प्रस्तावित करवाढीच्या नोटीसा पाठविण्यात येत असल्याने   यापुर्वी कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे नगरपालिकेकडून मालमत्ता करवाढीची नोटीस पाठविली असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहर हद्दीमध्ये वास्तवास असणाऱ्या नागरिकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन व येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही आमदार आवताडे यांनी यावेळी नगरपरिषद प्रशासनास दिल्या आहेत.
....................................
Pandharpur Live News
Youtube Channel Today's News



....................................

सदरील करवाढ नागरिकांवर अन्यायकारक आहे. यापूर्वी पाणीपट्टी मध्ये बरीच वाढ केली असून लगेच घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे हे अन्यायकारक आहे. कोरोना काळानंतर सध्या पंढरपूर शहर पुर्वपदावर येत असताना आपल्या नगरपरिषदेने भरमसाठ करवाढ केलेली असून ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. सदर नोटीस मध्ये नमुद केल्याप्रमाणे नवीन कर योग्य मुल्य निर्धारण निश्चित केली आहे हे कोणत्या निकषानुसार निश्चित केली याचा खुलासा करणे आवश्यक होते. त्याचबरोबर या करवाढीमुळे येथील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक झळ पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचेही आमदार आवताडे यांनी आदेशित केले आहे.

याप्रसंगी नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments