Pandharpur Live News:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात 150 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे काम आता वेगाने आणि वेळेत पूर्ण होणार आहे. या कामाला आता प्रत्यक्ष सुरवात झाली आहे.
विठ्ठल मंदिराचे संवर्धन करण्याचा कामासाठी राज्य सरकारने 73 कोटी रूपये मंजूर केले आहेत. हा निधी अपुरा असल्याने आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून वाढीव निधी मंजूर झाला असून तो आता 150 कोटी इतका केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 43 कोटींचा निधी मिळाला असून कार्तिकी यात्रेला (kartki yatra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. नागपूर अधिवेशन काळात पुरवणी बजेट मध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा काया पालट होणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हे दक्षिण काशी मानले जाते. येथील श्री विठ्ठल, रुक्मिणी आणि परिवार देवतांची मंदिरे शेकडो वर्षे पुरातन आहेत. काळाच्या ओघात त्यामध्ये वेळी वेळी रंग रांगोटी आणि दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र अलीकडे ही मंदिरे अधिक जीर्ण झाल्याचे, त्यांचे पुरातन स्वरूप हरवल्याचे दिसू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने श्री विठ्ठल रुक्मिणी आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी यापूर्वीच ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे..मंदिर सुधारणेचा आराखडा मंजूर असून प्रत्यक्ष कामकाजास कार्तिकी यात्रेपासून सुरुवात झालेली आहे. मात्र ७३ कोटी रुपयांचा निधी मंदिरांच्या विकासासाठी आणि मजबुती करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही, याकडे आमदार आवताडे यांनी कार्तिकी एकादशी वेळी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. तसेच वाढीव १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणीही केली होती. त्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंदिर सुधारणेसाठी १५० कोटी रुपये हिवाळी अधिवेशन दरम्यान मंजूर केले आहेत. .
..................................
0 Comments