याप्रसंगी बोलताना उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह प्रा. डॉ. मिलिंद परिचारक म्हणाले की प्रा. प्रवीण दवणे सरांसारख्या व्यक्तींची, विचारांची समाजाला गरज आहे. तसेच वाचन, संगीत यासारखे छंद माणसायला का जगायच हे शिकवतात असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन परिचारक यांनी प्रा. प्रवीण दवणे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपणसमोर येऊन मार्गदर्शन करीत आहेत हे आपले भाग्य आहे असे सांगून सरांनी केलेले मार्गदर्शन व त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब करण्याविषयीचे आवाहन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, तसेच कर्मयोगी डिग्री व पॉलिटेक्निक विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रा. भारत घोडके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


0 Comments