मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरातील मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे ( MLA Samadhan Aavtade) यांच्या हस्ते व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक (X MLA Prashant Paricharak) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
आ आवताडे यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारती पासून मुद्गुल ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक १७ मधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे ७.२४ कोटी, नागणेवाडी येथे सात लाख लीटर क्षमतेची आर सी सी उंच टाकी बांधणे भूमिपूजन ६५ लाख, साठे नगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २७१ मधील आरक्षण क्रमांक ५६ मधील जागेस संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे ७४ लाख,
मंगळवेढा (Mangalvedha City) शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंगळवेढा शहरातील सिटी सर्व्हे २७१ या जागेमध्ये साकार होणाऱ्या दिव्यांग भवन भूमिपूजन ३७ लाख असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील भालेवाडी येथे ११.०० वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि सायंकाळी ४.०० वाजता लक्ष्मी दहिवडी येथेही विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामांसाठी आ आवताडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. मंगळवेढा शहरातील मूलभूत व पायाभूत विकास बाबींची पूर्तता होऊन मतदार संघाच्या धोरणात्मक प्रगतीचा वेग गतिमान होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विविध विकास योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध केला आहे. त्या निधीच्या अनुषंगाने वरील सर्व विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, प्रांताधिकारी बी.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी चरण कोल्हे, मंगळवेढा नगरपरिषद नगर अभियंता प्रशांत सोनटक्के, कर निरीक्षक विनायक साळुंखे तसेच तालुक्यातील सामाजिक- राजकीय कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमांसाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments