Pandharpur Live News: ग्राहक रक्षक समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पंढरपुरातील विनय वनारे यांची निवड

Pandharpur Live News: ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ आशाताई पाटील यांच्या शिफारशीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पंढरपुरातील समाजसेवक विनय वनारे यांची निवड करण्यात आली आहे.

विनय वनारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असुन त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. आता ग्राहक रक्षक समितीच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.  येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी आणि ग्राहकांच्या न्यायासाठी झटू असा विश्वास वनारे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments