कर्मयोगीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाने दि. २७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये सुमारे ५० हून अधिकमाजी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी प्रतिनिधी सूरज क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी कॉलेजचा व कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाच्या प्रगतीचा आढावा माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला. कर्मयोगीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (computer science and engineering) विभागातून शिक्षण पूर्ण केलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थ्यानी परदेशामद्धे यशस्वी अभियंते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजग म्हणून कार्यरत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक (Rohan Paricharak) यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती कुलकर्णी यांनी केले. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments