Madha Loksabha Election : माढ्याच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच... जानकर -पवार भेटीने राजकीय वर्तुळात 'कुरकुरीत' चर्चा!

Pandharpur Live News Online : 

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या दुपारी होणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना (Mahadev Jankar) त्यांच्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज जानकरांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक 'कुरकुरीत' चर्चा सुरु झाल्यात.

अजित पवार (Ajit Pawar ) गटातील आमदार निलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार असल्याचे चर्चा सुरु आहेत. हे सुरु असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले? त्याची माहिती त्यांनी दिली. महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या काळापासून भाजपसोबत राहिले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात (Madha Loksabha Election) शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलाय. यामुळे हा मतदार संघ जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाविकास आघाडीची संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेंव्हा या भेटीनंतर पुढे काय घडामोडी घडाणार? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Post a Comment

0 Comments