Pandharpur: उद्या पंढरीत काँग्रेसचं मार्गदर्शन शिबीर, आ.प्रणितीताई शिंदे करणार मार्गदर्शन


पंढरपूर- सोलापूर शहर - जिल्हा कॉंग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन शिबीर मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी पंढरपूर शहर व तालुक्यासाठी श्री संत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे वेळ दुपारी 2 वाजता सोलापूर शहर - जिल्हा कॉंग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे,  प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले यांचे रोजी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

तरी संकल्प सभा आणि मार्गदर्शन शिबिरासाठी कॉंग्रेस व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक, नगरसेविका, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, आघाडी प्रेमी, सर्व नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  कॉंग्रेसचे ज्येष्ठ प्रकाशतात्या पाटील, महिला नेत्या सुनेत्रा पवार, चेअरमन अभिजीत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार व पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments