नेमके या शिलालेखांवर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे याचा अभ्यास करुन पुरातत्व खात्याने शोध लावणे अत्यावश्यक आहे. तातडीने पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी पंढरीत येऊन वरील सर्व वस्तुंची पाहणी करावी व त्यांच्याच देखरेखीखाली पुढील कामे व्हावीत, अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असुन येथील खोदकामात आढळुन आलेल्या वस्तुंचे व शिलालेखाचे फोटो व व्हिडीओ सुध्दा गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिले आहेत.
पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराला फार मोठा पुरातन इतिहास आहे, मंदिरात मागील काळात नवीन बांधकाम करताना अनेक पुरातन वस्तु, आणि ऐतिहासिक ठेवा जमिनीत गाडला गेलाय असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आज मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या निमित्ताने हा पुरातन ऐतिहासिक ठेवा समोर आला असुन आत्ता हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे व याच्या इतिहासाचा संशोधकांकडून व पुरातत्व खात्याकडून अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी होणारी सर्वच कामे हे कॅमेरा लावुन करण्यात यावीत. पुरातत्व खात्याच्या अभ्यासु व जाणत्या अधिकार्यांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे करण्यात यावीत, अशी मागणीही गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
0 Comments