Pandharpur Live News: मार्च महिना म्हटला की,वातावरण बदलाचे वारे वाहु लागतात नाही का ? खरय म्हणजे थंडीचा जोर हळुहळु ओसरुण या महिन्यात उकाडा जाणवायला सुरुवात होते या उष्णता युक्त वातावरणात मुलांच्या परिक्षेचा हि तयारीचा व कसोटीचा काळ या मार्च महिन्यात येवुन ठेपतो अशा द्विधा मनस्थितीत आपल्या कोकण वासीय बांधवांना ओढ लागलेली असते ती म्हणजे शिमगा या सणाची,,,,,,,,!
कोकणात प्रामुख्याने शिमगा या सणात अनेक वैविधता आहेत त्याचप्रमाणे अनेक परंपरागत रुढी व श्रद्धा धार्मिकता यात दडलेली आहे जसे कि,या उत्सवात पहावयास मिळतो तो म्हणजे ग्रामदेवतेची पालखी मिरवणुक ,गोमुचा नाच,संकासुर व त्यातुनच जोपासलेली परंपरागत धार्मिकता व रुढी युक्त परंपरा या कोकणात आवर्जुन पहावयास मिळते मन भक्तित दंग होवुन जातो व ग्रामदेवते समोर नतमस्तक होण्यास प्रत्येक भक्ताला एक वेगळीच श्रद्धेची जोड लाभलेली असते
चला तर मग बांधवहो ,,,,,आपण जाणुन घेवुया शब्दांकनांच्या मौलिक सफरीतुन दापोली तालुक्यातील आमखोल गावच्या शिमगा महोत्सवाची परंपरा व शिमगा उत्सवाची थोडक्यात महती या सफरीतुन व मातेला वंदन या लेखातुन करण्याचा अल्पसा प्रयत्न
शिमगा म्हणजे होळी या सणात दहा दिवस होळी पेटवली जाते पहिल्या होळी पासुन दहाव्या मोठ्या होमाला पेटवुन अबालवृद्ध प्रत्येक दिवशी होळी भोवती फेर धरुन बो़ब मारत आनंद व्यक्त करत गावची ईडा पिडा दुर सारण्याचे होळीला विनवणी करतात यावेळी मोठ्यान बरेबर लहानग्यांचा उत्साह वाखाणण्याजोगे असतो
याच दरम्यान म्हणजेच तिसर्या दिवशी ग्रामदेवतेची मिरवणुक पारंपारिक वाद्य सनई ढोल टिमकी व ताशा यांच्या तालबद्ध गजरात ग्रामदेवतेला पालखित बसवुन श्रद्धेने आपल्या मानाच्या ईतर गावांत भक्तांच्या दर्शना करीता प्रस्थान करण्यात येते यावेळी पालखी मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला अबाल वृदध मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत उपस्थित असतात या गाव भेठीत भक्त नवस व मातेचे पुजन करुन सुख समृदधीचे गार्हाणे यावेळी पाटलांकरवी केले जाते या आमखोल ग्रामदेवतेच्या पालखी मिरवणुकीत ग्रामदेवता काळेश्वरी माता,मावळेभाचे,शेंदरीकरीण माता यांना श्रद्धा भक्तिने पालखीत विराजमान केले जाते आजुबाजुंच्या गावांतुन ग्रामदेवतेला मिरवणुकीने श्रद्धेने पुन्हा आपल्या खेळ्यांकरवी भक्तांकरवी आमखोल गावात वाजत गाजत आणली जाते व त्यानंतर संपुर्ण गावात प्रत्येक गावात तिची मिरवणुक काढुन कोनाचे नवस फेडायचे असतील तर ते फेडले जातात व पुन्हा सुख समृद्धीची विनवणी मातेला करुन आपापल्या परीने तीची व खेळ्यांची यथाशक्ति भोजन व श्रद्धेने सेवादान यावेळी भक्तांकडुन केले जाते संपुर्ण गावातुन ग्रामदेवतेची पालखी मिरवणुकी नंतर तयारी केली जाते ती शेवटच्या मोठ्या होम अर्थात होळीची यावेळी ग्रामस्थ एकत्र जमुन होळीसाठी लागणारी लाकडे जमा करण्यासाठी संपुर्ण जंगल पिंजुन काढुन मोठ्या श्रद्धेने श्रमदान करतात व तो मोठा होम उभा करुन रात्री बारा वाजता पेटवली जाते होळी पेटवल्या नंतर होळीचे फाग म्हटले जातात व ग्रामदेवतेच्या पालखीला ही होळी भवती गोल फेरी मारली जाते हा होळीचा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी संपुर्ण गाव यावेळी एकवटला जातो मोठ्या होमाच्या दुसर्या दिवशी संपुर्ण गावभर धुळवड साजरी केली जाते एकमेकांना रंग लावुन रंगीबेरंगी रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली जाते रंगपंचमी च्या रंगात विविधांगी रंगरुपाची उधळण करत एकतेचा संदेश हि रंगपंचमी आपल्याला देते आपापसातील सलोखा कायम राहावा यासाठी सर्व बांधव सामील होत ग्रामदेवतेची पालखी देवळात नेवुन तिथे होळीच्या सणात झालेल्या चुकांची क्षमा मागत पुन्हा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे बळ मिळावे याकरीता मातेला साकडे घातले जाते व हा शिमग्याच्या सणाची परंपरागत साजरी करुन सांगता केली जाते
मुळातच शिमग्याचा आनंद व हा सण अनुभवायचा असेल तर कोकणातच गेल्या शिवाय पर्याय नाही कोरोना नंतरच्या काळात आर्थिक विवंचनेतुन त्याचा परिणाम सर्वच घटकांवर व कालातराने सणांच्या सुट्ट्यांवरही आलेला पहावयास मिळत आहे सुट्टी अभावी सणांच्या उत्सवांवरही त्याचा प्रभाव दिसत आहे मात्र ग्रामदेवतेच्या श्रद्धेपुढे सर्वकाही नगण्य समजणारे आमचे ग्राम बांधव होळीचा हा सण मोठ्या उत्साहाने समंजस्याने व श्रद्घेने उत्साहाने साजरा करतीलच कारण ग्रामदेवतेचा आशिॉवाद त्यांच्या पाठीशी आहे या काव्यातुन लेखन प्रपंचातुन काव्य सुमने आई काळेश्वरी माते चरणी अर्पण ,,,,,,,!
मंदिराच्या कलशावर
ध्वज फडके भगवे
चहुकडे नयनरम्य
हिरवळ मन सुखावे ।।१।।
विराजमान माऊली
तिची आम्हा साऊली
काळेश्वरी शेंदकरीण मावळेभाचे
हाकेला सदैव धावली ।।२।।
पालखीच्या माथी शोभे
भरजरी शाल सुंदर फुले
विद्युत रोशनाई झगमगे
नजराणा पाहुणी मन समाधानी डुले ।।३।।
श्री सनी गणेश आडेकर मुंबई
0 Comments