शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने गुरुवार दि.२८ मार्च रोजी शांतीसागर मंगल कार्यालय येथे पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिमध्ये शिवसेनेच्या संलग्नित असलेल्या सात ते आठ संघटना उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची होती. त्यांचे स्वागत उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी केले तर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांचे स्वागत माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले.
पुढे बोलताना संपर्क प्रमुख कोकीळ म्हणाले, मागच्या निवडणूकीमध्ये भाजपला शिवसेनेच्या मतदारणामुळेच विजय प्राप्त झाला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षातील पदाधिकारी एकत्र बसून त्या विधानसभेतील त्या तालुका आणि शहरामध्ये बसून समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व्हावा हा उद्देश आहे. अश्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या सर्वांवर नियंत्रणासाठी एक समन्वय समिती असेल आणि महाविकास आघाडी एकत्रित रित्या काम करेल.
भाजप सरकार लोकांची काम करत नाहीय, जनतेला न्याय मिळत नाहीय, दादागिरी वाढलीय हे थांबवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर लोकसभेतील तालुका आणि विधानसभेट असलेली बूथ निहाय यादी बैठकीत सादर करण्यात आली. यामुळे संपर्कप्रमुख कोकीळ यांनी जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख यांचे कौतुक केले.
मी निवडून आल्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापूर शहरात करण्याचे पहिलं काम मी करेन असा शब्द आ. प्रणिती शिंदे यांनी बोलताना दिला. जे काही आरोप करायचे असतील माझ्यावर करा माझ्या वडिलांना मधे आणू नका असा सल्ला विरोधकांना प्रणिती शिंदे यांनी दिला.
आपण तिन्ही पक्ष एकत्रित राहून जाती वादी पक्षाला बाजूला करूयात. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा महाराष्ट्रात तोंड वर काढणार नाही अश्या प्रकारचे काम करू. सगळे एकदिलाने काम करू. कोकीळ यांच्याबरोबर आमची बैठक झाली आहे. चर्चा ही झाली असल्याचे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
याबैठकीस उपनेता शरद कोळी, जिल्हाप्रमुख अजय दासरी, संभाजी शिंदे, गणेश वानकर, अमर पाटील, पुरुषोत्तम बरडे, विष्णू कारमपुरी, संभाजी शिंदे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, विधानसभा संपर्कप्रमुख काशिनाथ बासुतकर, लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड, महिला अध्यक्ष प्रिया बसवंती, प्रताप चव्हाण, मोहोळ तालुका प्रमुख बापू भोसले, उत्तर तालुका प्रमुख संजय पोळ, उपजिल्हाप्रमुख रवी कांबळे, संतोष पाटील, युवासेना प्रमुख बालाजी चौगुले, महिला आघाडी मोहोळ प्रमुख सीमा पाटील, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख आदी शांतीसागर मंगल कार्यालय येथील हॉलमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments