Pandharpur: पंढरपूरमध्ये आज व्याख्यात्या मुक्ता चैतन्य यांचे "बदलत्या काळातील डिजीटल आव्हाने" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन

Pandharpur Live News : पुणे येथील सुप्रसिद्ध मुक्त पत्रकार, लेखिका, सायबर व समाजमाध्यम यांच्या अभ्यासक, व्याख्यात्या मुक्ता चैतन्य  यांचे "बदलत्या काळातील डिजीटल आव्हाने" या विषयावरील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन पर व्याख्यानाचं आयोजन सुवर्ण तारका ग्रुप, पंढरपूर यांनी केले आहे.

कर्मयोगी सभागृह अर्बन बँक, खवा बाजार शाखा, पंढरपूर येथे आज रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता हा समारंभ संपन्न होणार असून यामध्ये  डिजिटल माध्यम शिक्षण का हवं ? , मुलांचा स्क्रिन टाईम कसा कमी करायचा ?, मुलींची ऑनलाईन सुरक्षा अशा विविध आणि ज्वलंत विषयावर व्याख्यात्या मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

तरी पंढरपुरातील वय वर्षे १५ आणि पुढील सर्व मुले-मुली, बंधु-भगिनी, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असं आवाहन सुवर्ण तारका ग्रुप, पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे. 

याठिकाणी  मुक्ता चैतन्य यांची स्क्रिन टाईम, पॉर्न खेळ ही पुस्तके विक्रीस उपलब्ध असतील.



Post a Comment

0 Comments