'टी सीरीज'च्या मालकाचा घटस्फोट? आमचे नाते मजबूत - भूषण कुमार


 टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी 2005 मध्ये अभिनेत्री दिव्या खोसला हिच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास राहिली. गेल्या काही दिवसांपासून भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे सांगितले जातंय. यांच्यामधील वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.

घटस्फोटाची चर्चा खोटी असल्याचे भूषण कुमार आणि दिव्याच्या टिमकडून सांगण्यात आलंय. आता या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमारने मोठा खुलासा केलाय.

भूषण कुमार म्हणाले की, दिव्याने ज्योतिषी कारणामुळे माझे आडनाव काढले होते. बाकी आमच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे. आमचे नाते मजबूत आहे. भूषण कुमार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

भूषण कुमार आणि दिव्या खरोखरच घटस्फोट घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. मात्र, यावर दिव्या खोसला हिने काहीच भाष्य केले नाही.


Post a Comment

0 Comments