जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंढरपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दिलेल्या 5 कोटी 5 लाख 21 हजार 704 रुपयांच्या निधीतून पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कामाची निविदाही प्रसिद्ध केलेली आहे. परंतु पंढरपूर शहरात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे त्या जागेवर पार्किंगचे आरक्षण असल्याने ते आरक्षण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नगर विकास विभागाला कळविलेले आहे. तसेच हे आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा सुरू असून पुढील आठ ते दहा दिवसात हे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
लकरच पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्वे नंबर 142 अंतर्गत संत गजानन महाराज पिछाडी रस्ता स्टेशन रोड पंढरपूर ही जागा मराठा सांस्कृतिक भवन साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करून संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत. पंढरपूर शहरात सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी आवश्यक असलेली चांगली जागा शोधण्यास विलंब झाला. सकल मराठा समाजाची पंढरपूर शहरात सांस्कृतिक भवन बांधण्याची मागणी मान्य झाल्यानंतर हा समाज अत्यंत सकारात्मक राहून प्रशासनाला सहकार्य केलेले आहे.


0 Comments