पंढरपूर, दिनांक 17- आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी अनेक सोयी सूविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाद्वार, कुंभार घाट व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छतेची पाहणी केली व संबंधित अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना दक्ष राहण्याबाबत निर्देशित केले.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या परिसरातील रस्ते व शौचालयाची स्वच्छता पाहणी करून पंढरपूर नगर परिषदेचे स्वच्छतेचे अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना स्वच्छता मोहीम व्यवस्थितपणे राबवण्याबाबत सूचित केले. रस्त्याच्या कडेची घाण, शौचालय स्वच्छ करणे, रस्त्याची साफसफाई करणे व शौचालय मधील विस्टा तात्काळ सक्शन मशीनच्या माध्यमातून काढून परिसरा बाहेर घेऊन जाणे याबाबतची माहिती घेऊन संबंधितांनी महाद्वार, कुंभार घाट परिसर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता राहणार नाही या अनुषंगाने तत्परता बाळगावी असे सांगितले.
यावेळी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री. वाघमारे व साफसफाई कर्मचारी उपस्थित होते.
*******
Ashadhi Wari 2024 : भाविकांनी स्वच्छता राखून आरोग्याची काळजी घ्यावी. डॉ प्रशांत जाधव. मुख्याधिकारी न पा: पंढरपूर
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांना पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छते विषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी भाविकभक्तानी स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन करत पंढरपूर नगर परिषदेने भावीकभक्तांना नम्र सूचना केली आहे. . वारकरी भाविक भक्तांनी उघड्यावर शौच करु नये तसेच शिळे अन्न उघड्यावर टाकू नये, धोकादायक इमारतीमध्ये राहू नये, कचरा गाडीचा कचरा टाकण्यासाठी वापर करावा व कचरा गाडीमध्ये आपला कचरा टाकावा अन्यत्र उघड्यावर कचरा टाकू नये, शिळे अन्न खाऊ नये नदीचे व बोअर चे पाणी पिऊ नये. नगरपालिकेने दिलेल्या टँकर मधून पिण्याचे पाणी प्यावे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, वारकरी बांधवांनी पत्रावळी व द्रोण याचा वापर करावा, थर्माकोल, व प्लास्टिकच्या साहित्याचा वापर करू नये.
वारकरी बांधवांनी आपले पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांच्या साठी पार्किंगची सुविधा अंबाबाई पटांगण सांगोला रोड एम एस ई बी परिसर, कुंभार घाट मरीआई मंदिर परिसर गजानन महाराज मठाच्या पाठीमागील भागामध्ये पार्किंगची सुविधा केलेली आहे रेल्वे मैदान तसेच कराड रोड वेअर हाऊस जवळ पार्किंगची सोय इस बावी वाखरी रोड विसाव्याच्या समोरील भागामध्ये पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये वारकरी बांधवांनी आपले वाहन पार्किंग करावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Comments