काही हीट सिनेमे दिल्यानंतर ‘घनचक्कर’ आणि ‘शादी के साईड इफेक्टस’सारख्या फ्लॉप चित्रपटांमुळे विद्याच्या करिअरचा ग्राफ खाली सरकत होता. पण आता तीच विद्या पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘बॉबी जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे. विद्याने या चित्रपटात तब्बल १२ वेगवेगळ्या अवतारात दिसली आहे.
आज समर शेख दिग्दर्शित बॉबी जासूस हा चित्रपट प्रेक्षकांसमोर दाखल झाला आहे. या सिनेमाची संपूर्ण कथा बॉलीवूडची फिमेल हीरो विद्या बालन हिच्या भोवतीच गुंडाळलेली आहे.
बीकीज अहमद ऊर्फ बॉबीची विद्याने या चित्रपटात भूमिका निभावलीय. बॉबीचा लहानपासूनचा हेरगिरी करण्याचा छंद पण, तिच्या वडिलांना तिची ही हेरगिरी आवडत नाही. बॉबीच्या आईला मात्र असे वाटते की तिने जासूस बनावे, पण तिच्या वडिलांना बॉबीच्या लग्नाची घाई असते.
जसजसे चित्रपटाचे कथानक पुढे सरकते त्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते, जिथे बॉबीला आपली डिटेक्टिव्ह एजन्सी सुरु करण्याचा मौका मिळतो. मग, बॉबीला वेगवेगळ्या केसेसही मिळायला सुरूवात होते. त्यामुळे अनेक कठिण प्रसंगही बॉबीसमोर येतात. मग, वेगवेगळ्या घटनांमधून प्रेक्षकांना आश्चर्यचकित व्हायची संधीही मिळते.
जसजसे चित्रपटाचे कथानक पुढे सरकते त्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते, जिथे बॉबीला आपली डिटेक्टिव्ह एजन्सी सुरु करण्याचा मौका मिळतो. मग, बॉबीला वेगवेगळ्या केसेसही मिळायला सुरूवात होते. त्यामुळे अनेक कठिण प्रसंगही बॉबीसमोर येतात. मग, वेगवेगळ्या घटनांमधून प्रेक्षकांना आश्चर्यचकित व्हायची संधीही मिळते.
या चित्रपटात विद्या बालनने साकारलेले १२ अगदी लाजवाब वठवलीत. विद्याच्या अभिनय क्षमतेचे प्रमाणही यामध्ये दिसून येते. विद्याच्या मानाने चित्रपटाचा मुख्य नायक अलीला फारसा वावच मिळालेला नाही. राजेंद्र गुप्ता, तन्वी आजमी आणि सुप्रिया पाठक यांच्यासहीत सगळेच कलाकार आपल्या भूमिकांत चांगले वाटतात.
आता जाणून घेऊया या चित्रपटाच्या त्रुटी. कथानक जरी उत्तम असले तरी कथानक आणि चित्रपटाची गती याचा काहीतरी घोळ झालेला दिसतो, बऱ्याचदा त्यामुळे चित्रपट एकच मुद्द्यावर स्थिर न रहाता भटकताना दिसतो. चित्रपटाच्या संगीतच्या बाबतीत म्हणाल तर शांतनु मोइत्रा आणि स्वानंद किरकिरे फारसे लक्षात राहतील अशी गाणी नाही झाली आहेत. चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात काहीसा कमी पडला आहे आणि याची सर्वस्वी जवाबदारी दिग्दर्शक समर शेखही याची आहे. हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही एकतर विद्याचे फॅन किंवा तिचा अभिनय पाहायचा असेल तरच अन्यथा ग्लास तोडा बारान्ना…

0 Comments