नायिकाप्रधान चित्रपट बनविणार विपुल शहा

विपुल शहाने आतापर्यंत अॅक्शन आणि नायकप्रधान सिनेमा केले असून त्यात ‘सिंग इज किंग’, ‘कमांडो’ आणि ‘हॉलिडे..’यांचा समावेश आहे. पण या वेळी तो नायिकेवर आधारित असलेला ‘जिंदगी एक पल’ सिनेमा बनवत असून त्यात प्रमुख भूमिका पूजा चोप्रा आणि मीरा चोप्रा साकारणार आहे.
विपुलने ‘कमांडो’ सिनेमाद्वारे पूजाला सिनेसृष्टीत आणले. यानंतर एकही सिनेमा तिला मिळाला नाही. या सिनेमाबरोबरच विपुल तिला ‘रुपनगर के चीते’ने रुपेरी पडद्यावर आणणार आहे. मीराने ‘गँग ऑफ घोस्ट्स’ मध्ये भूमिका साकारली, पण ती आपली वेगळी ओळख बनवू शकली नव्हती. याशिवाय नवोदित अभिनेत्री तनीषा पवारदेखील या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Post a Comment

0 Comments