डाळिंबाचे सौदे वजनावर; प्रशांत परिचारकांमुळे बाजार समितीची प्रगती


पंढरपूर 

राज्यातील व्यापार्‍यांचा पंढरीत ओघ वाढला

बंद घोडेबाजार पुन्हा सुरू

: पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रगतिपथावर पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी मोठा वाटा उचलला. यामुळे मोठी प्रगती होण्याबरोबरच शेतकर्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आजची प्रगतीची घोडदौड प्रशांत परिचारक यांच्या शिस्तबद्ध व काटेकोर नियोजनामुळेच झाल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी व शेतकरी बांधवांनी दिल्या.डाळिंब, बेदाणा, द्राक्षे या शेतमालाला सर्वात जास्त भाव देणारी बाजार समिती म्हणून पंढरपूरची ओळख आहे. डाळिंबाचे सौदे वजनावर करण्याची शेतकर्‍यांना अत्यंत फायदेशीर असणारी योजना प्रथम इथेच राबवली गेल्याने डाळिंबाचे सौदे करण्यासाठी बीड, जालना, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर येथील व्यापारी पंढरपुरात येत आहेत. सांगली, तासगावपेक्षा उत्तम सोयीसुविधा बाजार समितीत आहेत. संपूर्ण ४0 एकर भागाला वॉल कंपाउंड, चोवीस तास पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय अशा सर्व मूलभूत सोयीसुविधांबरोबरच शेतकरी व व्यापार्‍यांना शेतमाल, धान्याचे बाजारभाव समजण्यासाठी मोठय़ा प्रोजेक्शन टी. व्ही. ची सोय, संपूर्ण संगणकीय कार्यालयामुळे बाजार समितीतील व्यवहार जलद व पारदर्शकपणे होण्यास मदत होत आहे. डाळिंब, बेदाण्याचे विक्रमी सौद्यांमुळे रोजची ३00 ते ४00 कोटींची उलाढाल बाजार समितीमध्ये होत आहे. 
सध्या डाळिंब, कांदा, केळी यांच्या सौद्यासाठी नवीन चार हॉल बांधण्यात येत आहेत. समिती परिसरातील सुरक्षितता वाढविण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, प्रवेशद्वाराजवळ मोठय़ा कमानी व गेटमनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांच्या कष्ट करून पिकविलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. प्रशांत परिचारक यांनी सर्व सूत्रे ताब्यात घेऊन नियम व शिस्त लावून दिल्यामुळे पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव मोठय़ा आदराने घेतले जाते. आपला आदर्श घ्यावा असे काम करून दाखवा, असे प्रशांत परिचारक यांच्याकडून संचालक मंडळास व व्यापारी वर्गास वारंवार सांगितले जात असल्याचे व्यापारी सोमनाथ डोंबे यांनी सांगितले. 

बंद घोडेबाजार पुन्हा सुरू ■ कार्तिकी यात्रेत सुरू असलेला घोडेबाजार काही कारणांमुळे बंद पडला. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वारकरी कार्तिकी बाजारातील घोडे खरेदी करतात. अचानक बाजार बंद झाल्याने व्यापार्‍यांबरोबर भाविकांचीही तारांबळ उडाली. यामुळे पुढाकार घेऊन प्रशांत परिचारकांनी बंद पडलेला घोडे व जनावरांचा बाजार पुन्हा सुरू केला. यामुळे तालुक्यासह राज्यातील घोडे व्यापारी व ग्राहकांची चांगलीच सोय झाली आहे.


Post a Comment

0 Comments