केम, पाथर्डी सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद |
करमाळा तालुक्यातील पाथर्डी व केम येथे संजयमामा शिंदे यांच्या संपर्क अभियानास अद्भुत प्रतिसाद मिळाला. अनेकांनी गर्दी करुन संजयमामा शिंदे तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आता तुमची गरज आहे, असा सूर अनेकांनी काढला. दिवसभराचे ढगाळ वातावरण व अधून मधून बरसणार्या सरीही संजय शिंदे यांचे स्वागत करीत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रारंभी महिलांनी संजयमामा शिंदे यांचे औक्षण करुन स्वागत केले. करमाळा तालुक्यामध्ये ३0 वर्षांपासून पोकळ आश्वासने मिळत आहेत, परंतु पाणी आणण्याची खरी धमक संजयमामा यांच्यातच आहे, त्यामुळे केममधील सर्वजण त्यांच्या पाठीशी असल्याचे नामदेव तळेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले तर माढा तालुका शिंदे बंधूंमुळे सुजलाम सुफलाम झाला, तशी प्रगती शिंदे बंधूंकडून करमाळ्याची होईल, ही अपेक्षा कुर्डे मॅडम यांनी व्यक्त केली. करमाळा तालुक्यात विकासाचा मोठा प्रकल्प संजयमामा शिंदे यांनी उभा करुन बेरोजगारी हटवावी, अशी मागणी अरुण लोंढे यांनी केली. नागेश पारखे, वैभव तळेकर यांनी आपल्या मनोगतातून संजयमामा शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, आम्ही सर्वशक्तीनिशी त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली. केम येथील संपर्क अभियानात चेअरमन अरुण लोंढे, सचिन ओहोळ, सरदार पठाण, प्रमोद धनवे, वसंत आहोळ, दादा तळेकर, राजबाबा तळेकर, बाळासाहेब तळेकर, हरिभाऊ तळेकर, सचिन तळेकर, वसंत तळेकर, पिंटू जगताप तर पाथर्डी येथे सरपंच बाबासाहेब मोटे, सोसायटीचे चेअरमन दादा कुमार जानकर, बाळू मुलाणी, नामदेव तोडेकर, गणेश नाळे, मच्छिंद्र मोटे, अरुण तोडेकर, सदाशिव तोडेकर, चंद्रकांत तोडेकर, वैभव मोटे, बाबुराव मोटे, चांगदेव कानडे, मोहन जानकर, प्रकाश वैद्य, नागनाथ नाळे, राजू नाळे, गणेश नाळे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. विकासाला वाव ■ ज्याप्रमाणे कमी कालावधीत माढा तालुक्याचा विकास केला त्याहीपेक्षा पुढे जाऊन करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी वाव, व्यापकता आहे. नेतृत्वाची संधी दिली तर तुमच्या अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करेन. येथील जनतेचे प्रेम, जिव्हाळा फार लळा लावणारा आहे असे विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी सांगितले. |
0 Comments