मंगळवेढा : १९१३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या २१ व्या वर्षी १८-१८ तास अभ्यास करून अहोरात्र मेहनत घेऊन बहुजन समाजातील नागरिकांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून त्यांनी स्वत: शिक्षण घेऊन इतरांनीही शिकावे ही शिकवण दिली. त्याचा वसा दलितमित्र कदम गुरुजी ही संस्था चालवत आहे. खा. रामदास आठवले यांनी मंगळवेढा येथे बोलत होते. दलितमित्र कदम गुरुजी बँक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र इमारतीच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी खा.आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी कदम होत्या. व्यासपीठावर दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कदम, सांगोला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आ. गो. पुजारी, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, संस्थेचे सहसचिव एस. एस. भोसले, अँड. सुजित कदम, दत्ता पडवळे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष डॉ. मीनाक्षी कदम यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेबाबत माहिती सांगितली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, यतिराज वाकळे, एस. एस. काझी, सुनील सर्वगोड, जयराम आलदर, सिद्धार्थ लोकरे, विक्रम शेंबडे, प्रकाश सावंत, लक्ष्मण गायकवाड, राम बेंडे, बाबासाहेब साखरे, शशिकांत सावंत, प्रकाश सावंत, ब्रह्मदेव वाघमारे, चिमाजी कसबे, प्रा. औदुंबर जाधव, दिलीप सावंत, संजय वाघमारे, रजपूत काळे, मैनीनाथ खरबडे, पोपट पडवळे, प्रदीप खवतोडे व प्रशालेतील शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते. केंद्रास अनुदान ■ यावेळी खा. रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेसाठी आपल्या राज्यसभा खासदार निधीतून १0 लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले असून आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या माध्यमातून महाविद्यालयास मदत करण्याचे आश्वासन दिले. |
0 Comments