विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन २0१३-१४ या आर्थिक वर्षाची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कारखाना कार्यस्थळावर संस्थेचे संस्थापक चेअरमन आर.एस. रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरण संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीस कामगार पतसंस्थेचे संचालक शशीकांत पवार यांनी सभेच्या अध्यक्षपदी संस्थापक चेअरमन आर.एस. रणवरे यांच्या निवडीबाबतची सूचना मांडली व त्यास कामगार पतसंस्थेचे सभासद विष्णू शेळके यांनी सभासदांच्यावतीने अनुमोदन दिले.
श्रध्दास्थान माजी आ. कै. विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पूजन पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद दत्तात्रय देशमुख, रविंद्र काळोखे व नारायण कोरके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अहवाल सालात मृत पावलेले संस्थेचे सभासद, हितचिंतक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील दिवगंत यांच्याकरिता संस्थेचे संचालक तानाजी लोंढे यांनी सभेत श्रध्दांजली ठराव मांडला.
संस्थेचे संस्थापक चेअरमन आर.एस. रणवरे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेस सन २0१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ऑडीट अ वर्ग मिळालेला आहे. तसेच आर्थिक वर्षामध्ये संस्थेस रु. ३३ लाख १४ हजार नफा झालेला असून ११ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रणवरे यांनी सभेत दिली. सभेच्या अखेरीस संस्थेचे संचालक संजच कैचे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आर.एम. जाधव यांनी केले.

0 Comments