करकंब / | ||
करकंब (ता.पंढरपूर) येथे गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपसरपंच आदिनाथ देशमुख, भीमराव शिंदे, ग्रा.पं. सदस्य राहुल शिंगटे, पांडुरंग शेटे, अमरसिंह चव्हाण, मुस्तफा बागवान, संजय धोत्रे, राजू काझी, शहाजी काळे, महेंद्र पवार, लक्ष्मण शिंदे, भास्कर काळे, सुयोग नागरस, संजय शेटे, शशी गायकवाड आदींसह अनेक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरूवातीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी गणपती बसविणार आहात तेथे वाहतुकीस अडचण होणार नाही, पावसाने मूर्ती खराब होणार नाही, वीजेचा व्यवस्थित वापर, प्रेक्षकांची सोय, स्पीकरचा आवाज, मिरवणुकीत अडथळा नको आदी नियम पाळून प्रत्येक मंडळाने रितसर परवानगी घेऊन गणेशोत्सवाचा सण साजरा करावा. |
0 Comments