दमदार पावसाच्या एन्ट्रीमुळे यंदाचा गणेशोत्सव लय भारी |
सांगोला |
शहर व तालुक्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून चालू असलेल्या दमदार पावसामुळे शहर वासियांबरोबर शेतकरी सुखावला असून आजपासून गणेशोत्सावाला सुरुवात होत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच पावसानेही आपली दमदार हजेरी लावल्यामुळे दुष्काळ हटवून सुकाळ चालु होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध गणेश मंडळे, गणेशभक्त तसेच नागरिक सज्ज झाले आहेत. दमदार पावसाच्या एंन्ट्रीमुळे यंदाचा गणेशोत्सव लयभारी होणार असल्याचे बोलले जात आहे. आज शुक्रवारी श्रीगणेशाचे आगमन होत आहे. दहा दिवस चालणार्या गणेशोत्सवाची तयारी पूर्णपणे झाली असून शहरातील तसेच मोठय़ा गावांतील कांही मंडळांनी गणेशोत्सवासाठी बाहेरगावांहून मूर्ती मागविल्या आहेत. दरवर्षीच मोठय़ा उत्साहाने श्रीगणेशाचे स्वागत केले जाते. विविध शाळा, महाविद्यालयांमधूनही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. विविध शाळांचे विद्यार्थी श्रीगणेशाचे स्वागत मिरवणूका काढून करतात. सकाळपासूनच श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी तसेच आरास करण्यासाठी लागणार्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. शिवाजी चौक, नेहरु चौक, पोलीस स्टेशन वसाहतीसमोरील राजस्थानी कुंभार आदी ठिकाणी श्रीगणेशाच्या मूर्ती खरेदीसाठी गेल्या चार पाच दिवसापासूनच धांदल उडालेली दिसत आहे. पाऊस असताना सुध्दा आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करणे, दहा दिवस विविध उपक्रम राबविणे, मनोरंजनाचे कार्यक्रम करणे आदीसाठी मंडळे तयारीत असल्याचे दिसून येत आहे. उशीरा का होईना पावसाने समाधानकारक हजेरी लावली असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.गणरायाच्या स्वागतासाठी सांगोला शहर व तालुका सज्ज |
0 Comments