नायजेरियाहून आलेल्या विद्यार्थ्यावर 'नायडू'त उपचार
नायजेरियाहून आलेल्या एका अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याला 'इबोला'चा संशियत पेशंट म्हणून उपचारासाठी नायडू हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. पौड येथील एका कॉलेजमधील हा विद्यार्थी शिकत असून, ताप, खोकल्यासह अंगदुखीची लक्षणे जाणवल्याने त्याला संशयित म्हणून त्याला निरीक्षणाखाली ठेण्यात आले आहे.
'नायजेरियातील एक विद्यार्थी पौड येथील एका कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तो सोळा ऑगस्टला नायजेरियाहून पुण्यात आला. त्यावेळी त्याला कोणतीही लक्षणे नव्हती; परंतु नायजेरियाच्या भागात 'इबोला'चे पेशंट आढळत असल्याने त्याला २१ दिवस निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कॉलेजमध्ये त्याला बारा ते तेरा दिवस स्वतंत्र ठिकाणी ठेऊन त्याचे निरीक्षण करण्यात येत होते. तसेच दिवसातून तीनदा त्याची तपासणी करण्यात येत होती; परंतु गुरुवारी पहाटे त्याला ताप, खोकल्यासह अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने खबरदारी म्हणून सायंकाळी सहा वाजता डॉ. नायडू संसर्गजन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,' अशी माहिती आरोग्य खात्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी 'मटा'ला दिली.
रक्ताचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्या आले आहेत. त्याचा अहवाल उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला 'इबोला'चा संसर्ग पूर्णतः झाला की नाही याची खातरजमा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, पाहण्यासाठी क्लिक करा www.pandharpurlive.com
वर

0 Comments