मुसळधार पावसामुळे कौठाळीकरांना होडीतून प्रवास करावा लागत आहे. सोलापूर: कधी नव्हे तो यंदा धो-धो पाऊस झाल्याने कौठाळीकरांचा रस्ता बंद झाल्याने ग्रामपंचायतीने होडीची व्यवस्था केली आहे. दरम्यान, कौठाळी ते शेळगाव रस्त्याची दुरुस्ती गुरुवारी सुरू होणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी व लगतच्या गावात मागील आठवडाभरापासून (२१ ऑगस्ट) धो-धो पाऊस पडत आहे. एखादा दिवस सुटी घेऊन पाऊस पुन्हा-पुन्हा हजेरी लावत आहे. त्यातच कौठाळीच्या पाझर तलावाचे यावर्षीच काम पूर्ण झाल्याने तलाव भरुन ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे कौठाळी-कळमणला जोडणार्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कौठाळी गावातून बाहेर जाणार्या वाहनासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे बुधवारी कौठाळी ग्रामपंचायतीच्या वतीने होडीची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, कौठाळी-शेळगाव रस्ता खचल्याने व पूल वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. उपसरपंच धनंजय पाटील यांनी रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी बांधकाम खात्याकडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकामच्या उत्तर सोलापूर विभागाच्या वतीने गुरुवारी कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एस. टी. व अन्य वाहनांची सोय होणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुला-मुलींना सध्या रस्त्याच्या अडचणीमुळे बाहेर पडता येत नाही.(प्रतिनिधी) ■ शालेय विद्यार्थ्यांचे हाल
■ रस्त्याचे नुकसान
■ घरोघरी पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत

0 Comments