रिपाइं (ए) च्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिहीन मोर्चा काढण्यात आला. मोर्चासमोर बोलताना रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले. शेजारी प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे. सोलापूर : गेल्या ६0 वर्षांच्या कालावधीत देशात आर्थिक, राजकीय प्रगती झाली; मात्र दलित दलितच राहिला असून, त्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला असून गरीब हा दिवसेंदिवस गरीबच होत आहे. ही दरी कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जातीतील कुटुंबांना किमान ५ एकर जमिनी दिल्या जाव्यात, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भूमिहीन मुक्ती मोर्चात रामदास आठवले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, नगरसेवक रवी गायकवाड, अशोक सरवदे, माजी नगरसेवक अरूण भालेराव, के.डी. कांबळे, सुनील सर्वगोड, बाबू जगताप, कुमार वाघमारे, कीर्तीपाल सर्वगोड, लक्ष्मण रणधिरे, जितेंद्र बनसोडे, सूरज बनसोडे, विकास सरवदे आदी उपस्थित होते. राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा पार्क चौक, चार पुतळा, सरस्वती चौक, जिल्हा मध्यवर्ती बँक, दत्त चौक, माणिक चौक, विजापूरवेस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देशातील ७0 टक्के लोकसंख्या महागाईच्या खाईत लोटली आहे. सध्या सत्तेवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार भ्रष्ट आहे. त्यांना गाडल्याशिवाय राज्यातील गरीब जनतेला चांगले दिवस येणार नाहीत. वाढत्या महागाईमध्ये गरीब हा गरीबच होत चालला असून श्रीमंत हा दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत आहे. गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करायची असेल तर राज्यातील शासनाच्या आणि धनदांडग्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींचे समान वाटप करून, प्रत्येकी किमान ५ एकर जमीन द्यावी. येणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून खेचण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. भविष्यात महायुतीची सत्ता येणार असून, सर्वांसाठी सुखाचे दिवस असणार आहेत, असेही आठवले यावेळी म्हणाले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे म्हणाले की, राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या रमाई आवास योजनेंतर्गत मिळणारा निधी अत्यंत कमी असून त्याचे अनुदान वाढविण्यात यावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. सर्व मागासवर्गीय महामंडळांची आर्थिक तरतूद वाढविण्यात यावी. जातीच्या दाखल्यासाठी ५0 वर्षांची असलेली जाचक अट रद्द करण्यात यावी. विशेष घटक योजनेच्या लाभार्थींची रक्कम १ लाखऐवजी ३ लाख करण्यात यावी. जून महिन्यात फेसबुकवर झालेल्या विटंबनेप्रकरणात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आदी मागण्या यावेळी केल्या. (प्रतिनिधी) मोहोळची जागा महायुतीला सोडावी.. येणार्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ला सोडण्यात यावी अशी आपली मागणी राहणार आहे. तसेच राज्यात एकूण २0 जागा आपण मागितल्या आहेत. आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महायुती तुटू देणार नाही, प्रसंगी दोन पाऊल मागे घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. सोलापूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे, असे आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केले.

0 Comments