कैंची मंडप उभे राहिले गणेश मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठ सजली

घरगुती गणेशमूर्ती आराससाठी थर्माकोल सिंहासन विक्रीसाठी आले आहेत. ुटिळक चौकात गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल्स् सज्ज झाले आहेत. सोलापूर : गणरायाच्या स्वागतालाही मंडपवाले आणि डेकोरेटर मंडळी सज्ज झाली आहेत.दोन्हीच्या बुकिंग कामास कार्यकर्ते लागलेले आहेत. अनेक मोठय़ा मंडळांचे मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पूर्वीच झालेली रस्त्यांची दुरवस्था पाहता आता अनेक मंडळांनी सुज्ञपणा दाखवत खड्डेमुक्त मंडप अर्थात कैंची मंडपाला पसंती दिली आहे. तसेच काही मंडप व्यावसायिकांनी पोलीस कारवाईला घाबरून डॉल्बीची सेवा देण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. 
शहरातील मोठमोठय़ा मंडळांकडून हजारो रुपये देऊन मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र मंडपाचे भाडे यंदा स्थिर दिसून आले. १५ बाय २0, १५ बाय १५ आणि २0 बाय २0 असे तीन आकाराचे मंडप शहरात सर्वाधिक थाटले जात आहेत. १५ हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. 
११ दिवसांच्या उत्सवात मारले गेलेले खड्डे बुजवले जात नसल्याने महानगरपालिकेने मागील वर्षी काही मंडळांवर कारवाई केली. आता मंडळांमधला सुज्ञपणा जागृत झाला असून, खड्डे खोदून मंडप उभारण्याऐवजी कैंची मंडप उभारण्याकडे मंडळांचा कल दिसतोय. शहरात १५0 मंडपधारक आहेत तर १00 डॉल्बीधारक आहेत. (प्रतिनिधी)
गणेश मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठ सजली ■ लहान-मोठय़ा गणेश मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठ सजली आहे. मूर्ती विक्रेत्यांनी टिळक चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, साखर पेठ, विजापूर रोड, आसरा, सात रस्ता, नवीपेठ, रेल्वे स्टेशन या भागात रस्त्याच्या दुतर्फा गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स् लावले आहेत. या स्टॉल्स्वर १00 रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती आहेत. स्थानिक मूर्तिकारांबरोबरच पेणहून आणलेल्या गणेश मूर्ती येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. डॉल्बीचा आवाज तपासणार्‍या यंत्रामध्ये अचूक मापन दिसत नाही, त्यामध्ये दोष आढळून येते. तत्कालीन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना मंडपधारकांचे एक शिष्टमंडळ भेटून आवाज मोजणार्‍या यंत्राची चाचणी घेण्यात आली. छताच्या पंख्याचा आवाज ४५ डेसिबलच्या वर दाखवायचा. त्यामुळे यंदा डॉल्बीधारकांमध्ये सेवा द्यायची की नाही, यावर बैठक होणार आहे. 
- शावरप्पा वाघमारे
मंडप, डॉल्बीधारक 
महाराष्ट्र नकाशाच्या आकारातील मंदिर ■ थर्माकोल डेकोरेशनच्या साहित्यात यंदा १0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच मागणीही वाढली असल्याची माहिती प्रकाश डेकोरेटरचे प्रकाश सलगर यांनी दिली. गणपतीचे मंदिर, कमान, कलश, चक्र, मुकुट, फु लांचा गुच्छ, चक्रहार, दीपमाळ, छत्री आदी थर्माकोलचे सजावट साहित्य यंदाही तयार करून दिले जात आहे. यंदा मंदिर (२00 ते १000 रुपये), दीपमाळ (१00 ते १५0 रुपये) यांना विशेष मागणी दिसते. महाराष्ट्र नकाशाच्या आकारातील मंदिर हे या वर्षीचे खास आकर्षण ठरले आहे. सजावटीचे साहित्य बनविण्यासाठी खास करून कोलकात्याहून कारागीर बोलावण्यात आले आहेत. डॉल्बीची होणार चर्चा ■ विसर्जनाच्या दिवशी डॉल्बी लावण्याचा मोह मंडळांना आवरत नाही. मात्र, पोलिसांचा त्रास आणि दबावाला कंटाळून ठाणे जिल्ह्यात व्यावसायिकांनी ही सेवा द्यायला नकार दिला आहे. ४५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज ठेवला गेल्याचे कारण पुढे करून मागील वर्षी मोठय़ा प्रमाणात कारवाया झाल्या. नेमकी अशीच परिस्थिती सोलापुरातही आहे. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर डॉल्बीधारकांची बैठक होणार आहे. यामध्ये डॉल्बीची सेवा द्यायची की नाही, यावर निर्णय होणार आहे. तसेच भाडे, दरावरही चर्चा होणार आहे.

Post a Comment

0 Comments