सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर विद्यापीठ असे नाव देण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ कृती समितीच्या वतीने कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला 'सिद्धेश्वर विद्यापीठ' असे नाव देण्यासाठी सिद्धेश्वर विद्यापीठ नामांतर कृती समितीच्या वतीने सह्यांची मोहीम घेऊन कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची मागणी कृती समितीतर्फे करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी सर्वस्तरातील एक लाख एक हजार आठ स्वाक्षरी घेतल्या. या स्वाक्षरीचे निवेदन नुकतेच कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांना देण्यात आले. यावेळी प्रा. माळी, कृती समितीचे आनंद मुस्तारे, बिपीन धुम्मा, ऋषीकेश अकतनाळ, मल्लिनाथ साखरे, गिरीश तंबाके, राजेश सुतार, ओंकार हब्बू, सोमनाथ मेंडके हे उपस्थित होते.
0 Comments