श्री विठ्ठल अभियांत्रिकीत ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह)अभियंत्यांनी आपल्या प्रत्येक कार्यात प्रामाणिक राहून अहोरात्र परिश्रम करावे. आपण करणारे प्रत्येक कार्य नेहमी सकारात्मक विचारानेच करावे. त्यामुळे केलेल्या कार्याचा आनंद चिरंतन टिकतो व यश प्राप्त होते. त्याचबरोबर भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना अभियंत्यांची नजर संशोधक वृत्तीची असावी, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केद्रांचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के. सुरी यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या 'अभियंता दिना'च्या कार्यक्रमात भाभा अणुसंशोधन केद्रांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के. सुरी प्रमुख पाहुणो म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. विशेष अतिथी म्हणून आयरुवेदाचार्य डॉ. संतोष नागरे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल होते. पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संदेशातून डॉ. नागरे यांनी 'स्काय इज लिमिट, एम. इट' शास्त्रज्ञ डॉ. बालसुब्रमण्यम यांनी 'फोकस ऑन प्रझेंन्ट इनसाईड द पॅकेज' व शास्त्रज्ञ डॉ. सुरी यांनी 'इंजिनिअर्स आर क्रियेटर्स' असे सांगितले. प्रारंभी भारतर▪सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देऊन मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट उलगडून दाखविला.पुढे बोलताना डॉ. सुरी म्हणाले, परमेश्वरापेक्षा गुरू महत्वाचे असून ते अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असताना नकळत देशाचा विकास करत असतात. विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रेरित करताना, विज्ञान युगात वावरताना अज्ञानी लोकांना शिक्षित करण्याची जबाबदारी देखील त्यांनी भावी अभियंत्यांवर सोपविली. तसेच तंत्रशिक्षणातील प्रगती पाहून तरूणांनीच या राष्ट्राला अधिक बलशाली करणे गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जुन सागिंतले.
शास्त्रज्ञ डॉ. बालसुब्रमण्यम व आय.एस.टी.ई. चे विद्यार्थी अध्यक्ष श्रेयस बनसोडे यांनी देखील अभियंता दिनाविषयी विचार मांडले. यावेळी 'ऑलंम्पस २0१४'मध्ये मधील यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.श्री विठ्ठल अभियांत्रिकीत 'अभियंता दिन' उत्साहात साजरा

.jpg)
.jpg)
.jpg)

0 Comments