जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 31 लाख 76 हजार 415 मतदार
सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली असून 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 31 लाख 76 हजार 415 मतदार आहेत. यामध्ये 6 हजार 948 पोस्टल मतदार आहेत. मतदार यादीत 17 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याची शेवटची मुदत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांकडे निवडणूक निर्णय अधिकारी तर तहसीलदार दर्जाच्या अधिकार्यांकडे सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 3290 मतदान केंद्रे असून त्यासाठी प्रतिमतदान 1 प्रमाणे एका बीएलओची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 3290 मतदान केंद्रे असून त्यासाठी 3838 मतदान केंद्राध्यक्ष तसेच तेवढेच पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. राखीव कर्मचार्यांसह 23 हजार 27 कर्मचार्यांची नियुक्ती निवडणुकीसाठी केली जाईल, असे जिल्हाधिकारी गेडाम म्हणाले. या पत्रकार परिषदेस अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे, माहिती अधिकारी गोविंद अहंकारी उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष, पदाधिकारी निवडणुकीस अडसर नाही...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती, बाजार समिती सभापतीची मुदत संपल्यामुळे त्यांच्या निवडणुका कायद्यानुसार असल्यामुळे त्यांना आचारसंहितेचा काहीही अडसर नाही. ठरल्याप्रमाणे त्या त्या दिवशी त्या निवडणुका होतील, असे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांनी बँकेमार्फत व्यवहार करावेत....
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणार्या सर्व उमेदवारांनी बँकेतूनच खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीसाठी 28 लाख खर्चाची र्मयादा घालून देण्यात आली आहे. निवडणूक खर्चासाठी विशेष निरीक्षक येणार आहेत. या कालावधीत 10 लाखांपर्यंतची कॅश ने-आण करताना त्या त्या व्यक्तींनी इन्कम टॅक्स विभागाला पूर्ण कल्पना देणे बंधनकारक आहे.
पदाधिकार्यांच्या गाड्या जमा....
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती सभापती तसेच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह विविध मंत्र्यांची वाहने देखील प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत. पदाधिकार्यांकडील मोबाईल तसेच इतर शासकीय सुविधा बंद झाल्या आहेत.
विविध 18 कमिट्या...
जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक अधिकार्यांच्या स्तरावर 3 स्थिर सर्वेक्षण पथक, 3 भरारी पथक, 3 व्हिडीओ सर्वेक्षण पथक, 1 लेखा पथक, 1 व्हिडीओ पाहणी पथकाची त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पेड न्यूज व मॅनेजमेंट मीडिया कमिटीची स्थापना जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.
नव्याने काम सुरू करता येणार नाही....
आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही नवीन काम सुरू करता येणार नाही. जे काम सुरू करण्यात आले आहे ते चालू ठेवता येईल मात्र आदेश किंवा मंजूरी मिळूनही काम सुरू झाले नसेल तर ते काम आता सुरू करता येणार नाही. शासकीय योजनांना नव्याने मंजूरी देण्यात येणार नाही. मतदारांवर प्रभाव पडेल असा कोणताही नवीन प्रकल्प, कार्यक्रम, उद्घाटन घेता येणार नाही.
मतदार नोंदणी 5 दिवस
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी 10 दिवस अगोदर नावनोंदणी मोहीम संपते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 27 सप्टेंबर असल्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नावनोंदणी करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्या त्या तहसील कार्यालयात नावे नोंदवावीत. मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
निवडणूकीसाठी 3290 मतदान केंद्रे
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 44 लाख 67 हजार 281 आहे. यामध्ये मतदारांची संख्या 31 लाख 76 हजार 415 असून यात 36 मतदार तृतीयपंथी आहेत. मतदारांमध्ये 14 लाख 99 हजार 74 एवढे स्त्री मतदार तर 16 लाख 70 हजार 359 इतके पुरुष मतदार आहेत. यातील 30 लाख 37 हजार 975 मतदारांकडे मतदान ओळखपत्र असल्याचे जिल्हाधिकारी गेडाम म्हणाले. निवडणुकीसाठी 3290 मतदान केंद्रे राहणार असून मतदानासाठी 23 हजार 27 कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे काम सुरू असल्याचे गेडाम म्हणाले.
* 244 करमाळा : 2 लाख 77 हजार 396
* 245 माढा : 2 लाख 95 हजार 869
* 246 बार्शी : 2 लाख 88 हजार 598
* 247 मोहोळ (राखीव) :2 लाख 85 हजार 241
* 248 सोलापूर शहर उत्तर : 2 लाख 70 हजार 4
* 249 सोलापूर शहर मध्य : 2 लाख 73 हजार 647
* 250 अक्कलकोट : 3 लाख 28 हजार 736
* 251 दक्षिण सोलापूर : 2 लाख 90 हजार 672
* 252 पंढरपूर : 3 लाख 420
* 253 सांगोला : 2 लाख 69 हजार 477
* 254 माळशिरस (राखीव) : 2 लाख 96 हजार 355
* एकूण पोस्टल मते : 6 हजार 948
* करमाळा - अविनाश हदगल (राजेंद्र पौळ)
* माढा - मनीषा कुंभार (रमेश शेंडगे)
* बार्शी - रमेश चव्हाण (बालाजी सोमवंशी)
* मोहोळ - एम. बी. बोरकर (बी. आर. माळी)
*शहर मध्य - रवींद्र कुलकर्णी (ए. पी. भवारी)
* उत्तर सोलापूर - शहाजी पवार (हणमंत कोळेकर)
* अक्कलकोट - मिलिंद पाठक (गुरु बिराजदार)
* सोलापूर दक्षिण - श्रीमंत पाटोळे (बाबुराव पवार)
* पंढरपूर - संजय तेली (गजानन गुरव)
* सांगोला - श्रावण क्षीरसागर (श्रीकांत पाटील)
* माळशिरस - अमृत नाटेकर (रेखा दिवटे)
* विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार *
* 244 करमाळा : 2 लाख 77 हजार 396
* 245 माढा : 2 लाख 95 हजार 869
* 246 बार्शी : 2 लाख 88 हजार 598
* 247 मोहोळ (राखीव) :2 लाख 85 हजार 241
* 248 सोलापूर शहर उत्तर : 2 लाख 70 हजार 4
* 249 सोलापूर शहर मध्य : 2 लाख 73 हजार 647
* 250 अक्कलकोट : 3 लाख 28 हजार 736
* 251 दक्षिण सोलापूर : 2 लाख 90 हजार 672
* 252 पंढरपूर : 3 लाख 420
* 253 सांगोला : 2 लाख 69 हजार 477
* 254 माळशिरस (राखीव) : 2 लाख 96 हजार 355
* एकूण पोस्टल मते : 6 हजार 948
* निवडणूक निर्णय अधिकारी *
* करमाळा - अविनाश हदगल (राजेंद्र पौळ)
* माढा - मनीषा कुंभार (रमेश शेंडगे)
* बार्शी - रमेश चव्हाण (बालाजी सोमवंशी)
* मोहोळ - एम. बी. बोरकर (बी. आर. माळी)
*शहर मध्य - रवींद्र कुलकर्णी (ए. पी. भवारी)
* उत्तर सोलापूर - शहाजी पवार (हणमंत कोळेकर)
* अक्कलकोट - मिलिंद पाठक (गुरु बिराजदार)
* सोलापूर दक्षिण - श्रीमंत पाटोळे (बाबुराव पवार)
* पंढरपूर - संजय तेली (गजानन गुरव)
* सांगोला - श्रावण क्षीरसागर (श्रीकांत पाटील)
* माळशिरस - अमृत नाटेकर (रेखा दिवटे)


0 Comments