कार्तिकी यात्रे निमित्त वाहतुक मार्गात बदल
पंढरपूर दि.27- येत्या 03 नोव्हेंबर रोजी होणा-या कार्तिकी यात्रे निमित्त शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून, हा बदल दि. 28 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर 2014 पर्यंत अमंलात राहणार आहे.
या यात्रे निमित्त शहरात नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, तीन रस्ता मार्ग विसावा व जुना सोलापूर नाका येथे पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी वाहने कॉलेज क्रॉस रोड मैदान व वेअर हाऊस येथे पार्कींग करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे तसेच विजापूर मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळी मार्गे वेअर हाऊस येथे पार्कींग करावीत तर पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, बार्शी, सोलापूर, लातूरकडे जाणा-या सर्व गाड्या नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक मार्गे जातील.
पुणे-साता-याकडे जाणा-या सर्व गाड्या नवीन कराड नाका, वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या नवीन कराड नाका, गादेगांव फाट्या पासून जातील. त्याच दि. 28 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर पर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग त्याच बरोबर अनवली फाटा ते गौतम विद्यालय हा मार्ग एस.टी.बरोबरच जड वाहनांना बंद ठेवण्यात येणार आहे. दि. 06 नोव्हेंबर रोजी पोर्णिमेला होणा-या गोपाळकाला सोहळ्या निमित्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अनवली फाटा ते गोपाळपूर रोड हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर कडून येणारी वाहने टेंभूर्णी, मोहोळ, सोलापूर मार्गे अथवा टेंभूर्णी, अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा मार्गे विजापूरला जातील व येतील तसेच पुण्याहून येणारी वाहने महूद, सांगोला, मंगळवेढा मार्गे जातील व येतील. कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक, सहकार चौक ते सावरकर चौक तसेच सावरकर चौक ते नवीन कराड नाका या मार्गावर एकेरी वाहतूक राहील.
संबधित भाविकांनी या बदलेल्या वाहतुक मार्गाची नोंद घेऊन वाहतुक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000

0 Comments