बाबू नाभिकाच्या त्या वाक्याने सभा मंडपात दोन क्षण शांतता पसरली . कारण
अशी भन्नाट कल्पना आज पर्यंत कुणाच्याच डोक्यातून आलेली न्हवती आणि आली
असेलच तर जत्रा कमेटी समोर ती मांडण्याचे धाडस कुणीच आज पर्यंत केलेले
न्हवते . त्यामुळे बाबू नाभिकाच्या " औंदा आपल्या जत्रत महिलांच्या
कुस्त्या ठिवा " या वाक्यावर सगळेच अवाक झाले .
घोंडेवाडीतल्या मारुती मंदिराच्या सभा मंडपात आज नागरिकांची चांगलीच
गर्दी झाली होती . धोंडेवाडीची जत्रा महिन्यावर येउन ठेपली होती . जत्रेचे
कार्यक्रम ठरवण्याचे कामकाज सुरु होते . आजची हि मीटिंग कार्यक्रम
ठरवण्यासाठीच जमलेली होती आणि जवळ जवळ सगळे कार्यक्रम ठरल्यावर बाबू
नाभिकान महिलांच्या कुस्त्यांचा बॉम्ब टाकला होता त्या बॉम्ब ने
सभागृहातल्या सर्वांच्या काळजाचे ठोके चुकवले . बर्याच जणांच्या तोंडाचा आ
चांगलाच वसला गेला . या शांततेच भंग पाटलांनी केला . बाबूच्या अंगावर
खेकसत पाटील ओरडले " आ लगा पिउन फ़िउन येता का काय मिटींगला आ . " बोलताना
त्यांची नजर सरपंचीन बाईंवर होती . कारण सरपंचीन बाईंना असली कल्पना
आवडणार नाही ह्याची त्यांना खात्री होती . पाटील मीटिंग चं सगळं क्रेडीट
मारून जात्यात का काय या धास्तीन खचलेल्या उपसरपंच आप्पा साहेबांनी लगेच
पाटलांचा मुद्दा उचलून धरला " आ लगा धोंडेवाडीच्या बायांच्या डोस्क्यावरचा
पदर तरी खाली पडतो का कंदी ? . लागलाय चुरू चुरू बोलाया . बस खाली " असा
म्हणून त्यांनी सरपंचीनबाईनकड मान वळवली आणि विचारलं , " नै का वो बाई "
सरपंचीन बाईंनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण त्या उठून उभ्या राहिल्या
आणि म्हणाल्या " बाबू तुझी कल्पना झकास आहे "
सरंपंचीन बाईंच्या या वाक्यावर मिटींगला जमलेल्या सर्व धोंडेवाडीकरांच्या तोंडाचा आ पुन्हा वासला गेला .पाटलांनी सरपंचीन बाईकडे आश्चर्याने बघितले आणि विचारले , " काय बोलताय बाई . बाब्याची कल्पना आणि झकास ? " उपसरपंचांनी लगेच मध्ये तोंन्ड खुपसलं , " तर काय आता ह्येच र्हायल होतं का काय ? म्हंजी आत धोंडेवाडीच्या महिला फडात शड्डू ठोकून कुस्त्या करणार ? " सरपंचीन बाईंनी दोघांकडे शांतपणे बघितलं आणि त्या म्हणाल्या " का नको ? तिकडं महिला आत्राळ यानात बसूनश्यान पाक चंद्रावर चालल्या मंग धोंडेवाडीच्या महिला कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या तर बिघडलं काय ? धोंडेवाडीतल्या महिलांनी फकस्त चुली म्होर खपाव असा इच्चार हाय काय तुमचा ? " सरपंचीन बाईंचे हे उद्गार ऐकून पाटील आणि उपसरपंच गार झाले. सरपंचीन बाईंचे उत्तर ऐकून कुलकर्णी मास्तर एकदम उत्साहित झाले आणि त्यांनी तोंड उघडले .................( क्रमश ...भाग २ उद्या ..याच ठिकाणी ....

0 Comments