आता विष्णूलीलेवर आधारित एका आगामी मालिकेत तो पुन्हा विष्णूदेवांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे. 'खुद्द देवाचीच इच्छा असावी की मी त्यांची भूमिका साकारावी. म्हणून कदाचित माझ्याच नशिबात ही भूमिका येत आवी.' असं सौरभ म्हणतो. 'महाभारत' या स्टार प्लसच्या मालिकेत त्याने कृष्णाची भूमिका साकारली होती. आतापर्यंत फक्त पौराणिक भूमिका साकारल्या असल्या तरी कायम या भूमिकांमध्ये अडकून न राहण्याचं सौरभने स्पष्ट सांगितलं आहे. सौरभला लवकरच वेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाव्या यासाठी शुभेच्छा!

0 Comments