१५ नोव्हेंबरपासून ५४ जिल्ह्यांत अंमलबजावणी?
नवी दिल्ली : एलपीजी ग्राहकांसाठी सुधारित थेट रोख अनुदान हस्तातंरण सुविधा १५ नोव्हेंबरपासून ५४ जिल्ह्यांत आणि १ जानेवारीपासून संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार आहे. एका अधिकृत विवरणपत्रात म्हटले आहे की पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानने ५४ मधील ४ जिल्ह्यांमध्ये एलपीजीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्यासंबंधी करण्यात आलेल्या तयारीची समीक्षा करण्यात आली आहे. ही समीक्षा जिल्हाधिकार्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. या कॉन्फरन्सच्या वेळी जिल्हाधिकार्यांसोबतच पेट्रोलियम विपणन कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकार्यांचीही उपस्थिती होती.
या वेळी
मंत्र्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व युनिट्समध्ये
देवाण-घेवाण आणि ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या खात्यात एलपीजी अनुदान सहजपणे पोहोचले पाहिजे यावर जोर दिला. या योजनेअंतर्गत, एलपीजी ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रोख अनुदान मिळणार आहे, जेणेकरून ते बाजारदरात स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर खरेदी करू शकतील. पेट्रोलियम मंत्र्यांनी यापूर्वी या योजनेत आलेल्या अडचणींशी निगडित मुद्यावर चर्चा केली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्षाला मिळणार 12 सिंलेडर
वर्षभरात कधीही 12 सिंलेडर देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे प्रति महिनयाला फक्त एकच सिंलेडर पुरविण्याचे असलेले बंधन आता संपुष्टात आल्याने ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी वर्षाला 9 सिंलेडर पुरविले जात
होते. परंतु आता वर्षाला 12 सिंलेडर पुरविण्यात येणार आहेत. तसेच प्रति
महिन्याला केवळ एकच सिंलेडर देण्याचा निर्णही मंत्रिमंडळ बैठकीत मोडीत
काढण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वर्षभरात कोणत्याहीवेळी 12
सिंलेडर पुरविले जाणार आहेत. ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना
दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments