मुंबई: अभिनेता आमीर खानचा लोकप्रिय टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा तीसरा सीझन पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. सामाजातील अनिष्ठ रुढींवर प्रकाशझोत टाकणारा हा कार्यक्रम आहे. तिसऱ्या सीझनचा प्रोमो सध्या लॉन्च करण्यात आला आहे.

 आमीरनेही ट्विटरवून याबाबतची माहिती दिली आहे.

 “‘सत्यमेव जयते’चा नवा सीझन पाच ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवा प्रोमो पाहून, मला सांगा तुम्ही काय विचार करता”, असं आमीरने ट्विट केलं आहे.

 या सीझनमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यावेळी आमीर खान प्रत्येक भागानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहे.

या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पदुकोण, परिणीती चोप्रा आणि कंगणा राणावतही दिसणार आहेत.

‘सत्यमेव जयते’ चा पहिला सीझन 2012 मध्ये आला होता. त्यावेळी लोकांनी हा शो डोक्यावर घेतला होता. त्या तुलनेत दुसरा सीझन चालला नाही. मात्र आता तिसऱ्या सीझनकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

    प्रतिनिधी नेमणे आहेत...  

    • या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

     

    • आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...

      तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

      आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

      संपर्क साधावा...

     


-संपादक

भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात,

पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499

8308838111

8552823399

कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

 

www.pandharpurlive.com

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------